अहेरी:- अहेरी तालुक्यातील जिल्ह्याच्या पूर्व दिशेला महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या दामरंचा गावाला अहेरी डेपोतून बस सोडली जाते दररोज प्रमाणे अहेरी वरून दामरंचा बस सायंकाळी निघाली मात्र गुड्डीगुडम जवळ बस अचानक बिघाड होऊन ठप्प दोन तीन तास झाले तरी बस हालली नाही, परिणामी दामरंचा परिसरात एकच बस असल्याने दुसऱ्या बसेस चे पर्याय नसल्याने बस बिघाड झाल्याने प्रवासी तहानेने भुकेने व्याकुळ होऊन रस्त्यावर मिळेल ते खाऊ जसे आईस्क्रीम खाऊन वेळ भागवले आहेत..अश्या गंभीर वेळ फक्त दामरंचा परिसरातील प्रवाशांना अनुभवायला मिळतो. हे मात्र विशेष.
अहेरी डेपो भंगार बसेस च्या नावाने नावाजलेला आहे, कधी बस चे टप्पर उडतो तर कधी बस मधून पाणी गळतो तर कधी बस ला दे धक्का मारून बस सुरू करावा लागतो अशी आहे अहेरी बस डेपोतील बसेस……
बस डेपो मात्र एक म्हण गात असतो ते आहे.. *प्रवाशाच्या सोयी करिता,,,हात हलवा,, बस थांबवा*
ग्रामीण भागात मात्र ही समस्या
या गंभीर समस्या कडे लोक प्रतिनिधी लक्ष देऊन ग्रामीण भागात चांगल्या दर्जाचे बस पाठवावी अशी माणसं ग्रामीण भागातील प्रवासी करीत आहेत.
नोट- दामरंचा ह्या परिसरात दहा ते बारा गावे येत असून या परिसरात एकच बस सोडली जात आहेत,जर बस बिघाड झाल्यास प्रवाशचे हाल न सांगणारा असतो,, आज ही परिस्थिती जवळून अनुभवास मिळालं.
गुड्डीगुडम-निमलगुडम मधात बस बिघाड झाल्याने बस मध्ये भरगच्च प्रवासी बेहाल झालं म्हणून एक बस न सोडता दिवसातून दोन बस सोडावी
श्रीनिवास गादासवार
भाजप नेता कमलापूर