चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती साजरी

38

प्रतिनिधी//

गडचिरोली :- अशोक वन कॉलनी गोकुळनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंत साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुनिश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष आरपीआय होते . प्रमुख मार्गदर्शक आयशा अली शेख एमआयएम , तुळशिराम सहारे माजी नगरसेवक होते .
या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुनिश्वर बोरकर म्हणाले की , सम्राट अशोकाने ८४ हजार विहार बाधले . मुलगी संघमित्रा र्व मुलगा महेंद्र यांनासुद्धा श्रीलंकेत धम्म प्रसारासाठी पाठविले . पण सम्राट अशोकाचा इतिहास नष्ट करण्यात आला . या प्रसंगी आयशा अली शेख एमआयएम तसेच तुळशिराम सहारे माजी नगर परिषद सदस्य यांनीसुद्धा आपके विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भोजराज कान्हेकर यांनी केले तर आभार निशा बोदेले यांनी मानले .
या कार्यक्रमाला दामोधर शेंडे , प्रेमलता कान्हेकर , सुभांगी देवगडे , सुनिल गोवर्धन . युविका गोवर्धन अरुणा उंदिरवाडे , कोमल भैसारे , आशा खोब्रागडे , वृक्षाली उंदिरवाडे , सलोचना साखरे, मंगला बाबनवाडे , प्रियका साखरे , सुकेशिनी रामटेके , हेमंत उंदिरवाडे , चंद्रमनी रामटेके , डवाजी बाबनवाडे , सुरज उंदिरवाडे , करुणा अंबादे, कल्याणी गोडाने , माया मेश्राम , भुजग भांडेकर , सरीता शेडे , मधुकर लाटीलवार , मधूकला लाटीलवार , भिमराव गोडाणे , सुषमा ढवळे इत्यादी उपस्थित होते .