भागवत सप्ताहाने मन उत्साही व चांगले विचार निर्माण होतात..मा.खा.डॉ. अशोकजी नेते

34

गुढीपाडवा व रामनवमी निमित्त भागवत कथा व हनुमान प्राणप्रतिष्ठा सोहळा मौजा- खरपुंडी येथे आयोजित..

गडचिरोली :- मौजा-खरपुंडी (ता. जि. गडचिरोली) येथे गुढीपाडवा व चैत्र रामनवमी निमित्ताने श्रीमद् भागवत कथा सप्ताह व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पवित्र सोहळा दिनांक ३० मार्च २०२५ ते ०६ एप्रिल २०२५ या कालावधीत सार्वजनिक हनुमान मंदिर, खरपुंडी येथे आयोजित करण्यात आले होते.

या धार्मिक कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजच्या काळात भागवत सप्ताहाचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून आचार, विचार आणि संस्कारांची जडणघडण होते. भागवत कथा ऐकल्याने मन शुद्ध व उत्साही होते व सकारात्मक विचारांची निर्मिती होते.”असे प्रतिपादन या भागवत सप्ताह प्रसंगी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

गावातील बंधू-भगिनी व बालगोपालांनी या सप्ताहात मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. विशेषत: सुप्रसिद्ध गायक व नाट्यकलावंत श्री. दिवाकर बारसागडे यांनी ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा’ या भजनावर मनोहारी सादरीकरण केले. त्यांच्या भक्तिरसात न्हालेल्या प्रस्तुतीमुळे महिला भक्तगण भक्तिरसात तल्लीन होऊन नृत्य व भजन गात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.

या सोहळ्याला भाजपा तालुका महामंत्री रमेशजी नैताम, अरुणजी नैताम, नितिनजी जुवारे, वासुदेवजी नैताम, आकाश गुरूनुले, पियूष भांडेकर, अरुणजी टिकले यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने बंधू-भगिनी व बालगोपाल उपस्थित होते. हा संपूर्ण सप्ताह भक्तिरसात व आध्यात्मिक वातावरणात पार पडला.