सारंग जांभुळे यांनी रक्तदान करत साजरा केला वडिलांचा वाढदिवस

38

माझ्या वडिलांनी मला नेहमीच इतरांना मदत करण्याची शिकवण दिली

गचिरोली:आरमोरी :- 3 एप्रिल 2025 रोजी सारंग नरेंद्र जांभुळे यांनी आपल्या वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

वडिलांना सन्मान देण्यासाठी त्याने आपले पहिले रक्तदान केले आणि विशेष म्हणजे हे रक्त एका लहान मुलीला दान करण्यात आले.

जिल्हात रक्ताची गरज होती. श्री. सारंग नरेंद्र जांभुळे म्हणतात “माझ्या वडिलांनी मला नेहमीच इतरांना मदत करण्याची शिकवण दिली. त्यांच्या वाढदिवसाला मी रक्तदान करून त्यांचा सन्मान करायचे ठरवले होते.

माझे रक्त एका लहान मुलीला उपयोगी पडले, हे पाहून मला खूप समाधान वाटले, ” असे सारंग जांभुळे यांनी सांगितले. रक्तदान हे एक असे दान आहे, जे थेट एखाद्याचे प्राण वाचवू शकते. डॉक्टरांच्या मते, एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन जणांचे जीव वाचू शकतात.

तरीही, अनेकांना रक्तदानाबद्दल भीती किंवा गैरसमज असतात. या तरुणाच्या कृतीने समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे – रक्तदान म्हणजे जीवनदान!
रक्तदान करा, जीवन वाचवा! तुमच्या एका छोट्या प्रयत्नाने एखाद्याला नवे आयुष्य मिळू शकते. विशेष प्रसंगी रक्तदानाचा संकल्प करून आपण आपल्या प्रियजनांचा सन्मान करू शकतो आणि समाजाला मदत करू शकतो.