मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत देचलीपेठा अंतर्गत येत असलेल्या शिंदा येथील रहिवाशी मल्लेश आत्राम (वय ४०वर्षे ) यांनी मोहफुल वेचायला जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.हा अपघात रविवारी सकाळी घडला.ज्यामुळे मल्लेश आत्राम यांना गंभीर जखमा होऊन त्यांना तात्काळ देचीलपेठातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अजूनच बिगडली आणि त्यांना जिमलगाट्टा तसेच तिथून अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे नेथ असताना मृत्यू झाले होते.रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अपघातानंतरची धावपळ सुरू होती.आणि शिंदा येथील आविसं व काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील सडमेक व सत्यम नीलम यांनी घटनेची माहिती अजयभाऊ कंकडालवार यांना दिल्याने स्वतः च्या उपस्थिती मयताच्या मृतदेहाला शवागारात ठेवण्यात आले.आज सकाळी अजयभाऊंचे खंदे समर्थक व अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांची नेतृत्वाखाली शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मयत मल्लेश मांता आत्राम यांच्या कुटुंबासाठी ही एक अत्यंत वेदनादायक घटना आहे.ज्याने संपूर्ण शिंदा व परिसरात शोककळा पसरली आहे.या अपघाताच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.त्यावेळी आत्राम कुटुंबाची घरचा परिस्थिती अंत्यत हलखीची असल्यामुळे शव विच्छेदनाची सामुग्री व शव स्वागवी नेण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण भासत होती.उपस्थित कार्यकर्त्यांनी सदर विषय माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना सांगितले होते.तात्काळ शव स्वगावी नेण्यासाठी चार चक्की गाडीची व्यवस्था करून दिले.तसेच होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमलाही आर्थिक मदत करण्यात आली आहे.