मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.
राजाराम: अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम येथे डिजिटल जिल्हा परिषद केंद्र शाळा आहेः सदर शाळेत 158 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज प्रथमच व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष यांचे विनंती वरून पालक सभा आयोजित करण्यात आले आहे.आणि नव शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत स्वागत करण्यात आले आहे. व शिक्षक व पालक याच्यात विविध विषयावर चर्चा करण्यात आले आहे. तसेच नवंनियुक्त शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेत विविध समस्या आहे जसे संपूर्ण शिक्षक, वेळेवर न येणे, पोषण आहार बरोबर न देणे,अध्ययन न करणे, शाळेच्या अवतीभोवती अस्वच्छता, हातपंपाजवळ घाणीचे साम्राज्य आदी विषय बाबत पालक सभेत मुद्दा उपस्थित केले .
पालक सभेला आवर्जून उपस्थित शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष मनोज सिडाम, राजाराम गावातील उपसरपंच रोशन कंबगोनिवार, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भाऊ तलांडे, शाळा व्यवस्थापक समितीचे सचिव तथा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक अजय पस्पूनूरवार उपाध्यक्ष मनोज सिडाम, जितेन्द्र गड्डमवार,पत्रकार मधुकर गोंगले, सुरेश मोतकुरवार,मीना सडमेक, सरिता बामनकर,केवल गड्डमवार,रवींद्र पंजलवार,संतोष बामणकर महेश निष्ट्ररी, संतोष चंदनखेळे, देवाजी आत्राम, महेश कुसराम,पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते तर,शाळेचे शिक्षक, परकीवार,एस.जुमनाके, जी. के.मडावी बी. आत्राम.कु, शिक्षिका मनीषा रोहणकर,अजय कडते, जितेंद्र पेंदाम इत्यादी शिक्षक उपस्थित होते.