मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी:-* तालुक्यातील वडलापेठ येथे नव्याने होत असलेल्या सुरजागड इस्पात प्रकल्पाबाबत गडचिरोली येथे २४ मार्च रोजी जनसुनावनी घेण्यात येत आहे, अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात ही जनसुनावणी न घेता गडचिरोली येथे घेणे हे स्थानिक जनतेसाठी अन्यायकारक आहे असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी रुक्मिणी महालात आज आयोजित पत्रकार परिषदेत केले. तसेच यापुर्वी ही सुरजागड बाबत झालेले सर्व जनसुनावनी फार्सच ठरले, स्थनिक जनतेला आपली बाजू योग्य प्रकारे मांडू न देता सुरजागड कंपनी तर्फे दडपशाही चालू असल्याचे राजे साहेबांनी सांगितले.
जनसुनावनी मध्ये मोजक्या अनुकूल लोकांनाच ऊभे केले जाते आणि कंपनी साठी अनुकूल असलेले वाक्य वदवून घेतल्या जाते. जनसुनावनी घेतांना सर्रासपणे कायद्याची पायमल्ली केली जातांना आढळते. इतर कोणीही आसपासही भटकू शकणार नाही असा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असतो यामागे कारण काय ? असा सवाल राजेंनी ह्यावेळी केला. दरवेळेस सुरक्षेचे निमित्य साधून गडचिरोलीला जनसुनावनी घेतली जाते. अहेरी तालुक्यात आता गैरशक्तींचे प्रस्थ फारसे ऊरले नाही असे प्रशासनसुध्दा नेहमीच सांगत असते तेव्हा नियमानुसार प्रकल्प होणार असलेल्या परिसरातच जनसुनावणी व्हायला पाहीजे आणि प्रत्येक गोरगरीब आदिवासींना भयमुक्त वातावरणात आपले म्हणने मांडण्याची संधी मिळायला पाहीजे किंबहुना तो त्यांचा हक्कच आहे असे राजेंनी ह्यावेळी सांगितले.यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला होता काय? या पत्रकाराच्या प्रश्नाला ऊत्तर देतांना मा.मुख्यमंत्री तथा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकार्यांना ह्याबाबत पत्र पाठविले आहे गरज पडल्यास पुन्हा मुख्यमंत्र्यांशी ह्याबाबत वैयक्तीकरीत्या मी बोलणार असल्याचे राजेंनी ह्यावेळी सांगीतले.गडचिरोली येथे होणार्या ह्या जनसुनावनीस आपला स्पष्ट विरोध असुन जनसुनावनी अहेरीतच रितसरपणे व्हायला हवी अन्यथा गरज पडल्यास जनतेला घेऊन रस्त्यावर ऊतरु असा इशारा भरगच्च पत्रकार परिषदेत राजे साहेबांनी दिला.
एटापल्ली येथील लोक प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर स्थनिकांना डावलून बाहेरील युवकांना रोजगार देणे, स्थनिकांना तांत्रिक प्रशिक्षण न देणे, रस्ताची दुरावस्था, मोठ्या प्रमाणावर होत असलेले वन प्रदूषण, दलालांचा प्रत्येक बाबीत हस्तक्षेप ह्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता कमालीचे हैराण झाली असून ही परिस्थिती बदलली नाही तर लवकरच जनतेला घेऊन मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा ही ह्या पत्रकार परिषदेत राजे अम्ब्रीशराव महाराजांनी दिला तसेच कंपनी तर्फे स्थनिकांना रोजगार देऊन आमच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारचा मूलभूत सुविधा जनतेला मिळायला पाहिजे अशी भूमिका मांडत राजेंनी चांगल्या काम केले तर नक्कीच माझी साथ राहील अशी ग्वाही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.!!