पेनगुंडा येथे पोलिस दादालोरा खिडकीचा माध्ममातून भव्य जनजागरण मेळावा व महिला मेळावा महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी,

25

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

दि.20/03/2025 रोजी भव्य जनजागरण मेळावा व महिला मेळावा पोलिस मदत केंद्र पेनगुंडा येथे *मा.पोलीस अधीक्षक श्री.निलोत्पल सा, मा.अप्पर पोलिस अधीक्षक श्री एम रमेश सा.(प्रशासन) , मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख सा. (अभियान), मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री.सत्य साई कार्तिक सा.* यांचे संकल्पनेतून व मा *. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमर मोहिते सा* भामरागड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा व महिला मेळावा महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी, त्यांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी, भव्य जनजागरण मेळावा व महिला मेळावा *पोलिस मदत केंद्र पेनगुंडा येथे आयोजन करण्यात आले.
भव्य जनजागरण मेळावा व महिला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राणी दुर्गावती, माता जिजाऊ व बेबी मडावी यांचे प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो.उ.नि.रमेश चौधरी सा. यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू महाका (सरपंच पेनगुंडा) व तसेच जिल्हा पोलीस अमलदार व एस आर पी एफ अमलदार कार्यक्रमास उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी गणेश फुलकवर सा.यांनी पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली व महिला विषयी कायद्यातील तरतुदी बाबत मार्गदर्शन केले. व यापुढे नक्षल्याचा कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नये म्हणून मार्गदर्शन केले.
* मेळाव्यामध्ये खालील साहित्य वाटप करण्यात आले.
* *आधार कार्ड कॅम्प* घेण्यात आले.
१) *साडी* – 20
2) *छत्री* – 30
3) *मच्छरदाणी* – 10
4) शिलाई मशिन 02
5)स्कूल बॅग व नोटबुक 40
13)आधार अपडेट 13
मेळाव्याकरिता हद्दीतील 100 ते 150 महिला, पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्या करिता उपस्थित सर्व नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मेळावा शांततेत पार पाडण्याकरिता ज़िल्हा पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच SRPF चे अधिकारी व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.