मुलचेरा : तालुक्यातील मौजा मल्लेरा येथे शहीद झालेल्या स्वातंत्र्य वीर बाबूराव फुलेश्वर शेडमाके यांच्या आज जयंती निमित्त औचित्य साधून मल्लेरा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाला गावचे माजी पोलिस पाटील देवाजी ओडेंगवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
१८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर- गडचिरोली भागातील सावकार तथा इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता.गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड तथा इतर गैर गोंडियन समाजास सावकारांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्या करिता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले होते.
तसेच क्रातीविर बाबुराव पूल्लेश्वर शेडमाके यांच्या कार्यक्रमात
यावेळी ,ग्राम पंचायत उपसरपंच सौ उज्वालाताई मरापे, ग्राम पंचायत सदस्य रामेश्वर तोरे, ग्रामकोष समिति अध्यक्ष नितेश कुसनाके, वसंत ईष्टाम, ,आदिवासी समाज अध्यक्ष चिन्नाजी कोवे, आदिवासी संचालक राकेश मरापे, सल्लागार केजिकराव आरकें,हनमंतू सिडाम,नानाजी आत्राम,अनिल कोवे.राकेश मरापे,दिनेश मरापे,श्रीनिवास मरापे, मोजिकराव आर्के, आनंदराव मडावी,गोपीनाथ आलाम,विलास ईष्टाम,संजय मरापे, सदाशिव तोरे
,सीताराम अलाम,अमसा सिडाम, अरविंद पेंदाम, राहुल सिडाम, आणि आमचे महिला मंडळी सौ. ताराबाई वेलादी, चींनीबाई मरापे, सुमनबाई नैताम, प्रेमिला सिडाम, मीराबाई सिडाम, प्रिया आलाम, रुपाली नैताम, उज्वालाबाई मरापे, वनिता मडावी, समस्त गावकरी उपस्थित होते
उपस्थित होते.