माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव महाराजांनी मूलचेरा येथील बाबूराव आत्राम यांच्या कुटुंबाला केली 10 हजार रुपयांची आर्थिक मदत #jantechaawaaz#news#portal#

47

दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत

मूलचेरा:-
तालुक्यातील स्थानिक मूलचेरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.11 येतील रहवासी असलेले बाबुराव आत्राम यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब  राजे अम्ब्रिशराव महाराज 

माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी बाबुराव आत्राम यांच्या कुटुंबाला 10000 रुपयाची आर्थिक मदत केली.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार झाला  विशेष बाब म्हणजे आज बाबूराव आत्राम यांची तेरावीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि तसेच आत्राम कुटुंबाला सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिल.विशेष बाब म्हणजे अहेरी 

इस्टेट चे दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील लोकांना अडी-अडचणीत,रोगाने ग्रासलेल्या, तसेच संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक कॅन्सर पीडित लोकांना आर्थिक मदत केली आहे,त्यावेळी मूलचेरा नगरपंचायत येथेल नगरसेवक दिलीप आत्राम, सामाजिक कार्यकर्ते 

गणपत मडावी, तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, ग्रापंचायत सदस्य बादल शाह,गणेश गारघाटे,पवन आत्राम, प्रवीण कुमरे, अक्षय खिरटकर तसेच बाबूराव आत्राम यांचे कुटुंबातील सदस्य आणि मूलचेरा येथील गावकरी उपस्थित होते.