उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे नेते संदीप कोरेत यांनी धनुष्यबाण घेतला हाती*
गडचिरोली
शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली असुन कन्हान येथील आभार सभेत उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे संदीप कोरेत यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला.
शिवसेनेने ऑपरेशन टायगर मोहीम हाती घेतली असुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील अनेक विविध पक्षातील नेते कार्यकर्ते शिवसेनेत मोठया संख्येत प्रवेश घेत आहे.गडचिरोली जिल्ह्यात ही शिवसेनेने पक्ष मजबूत करण्यासाठी विशेष लक्ष दिले असुन शिवसेनेचे पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हयातील तळागाळात काम करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास टाकत पक्षात प्रवेश करण्यास सुरवात केली आहे.
शिवसेनेने ऑपरेशन टायगर ची सूरवात दक्षिण गडचिरोलीतून केली असून अहेरी उपविभागात जनाधार असलेले, व उत्तम संघटक अशी ओळख असलेले संदीप कोरेत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यानी प्रभावित होवून पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, सह सम्पर्क प्रमुख हेमंत जम्बेवार यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. संदीप कोरेत यांनी विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत अनेक वर्ष काम केले आहे. अहेरी विभागात उत्तम संघटक अशी ओळख असलेले संदीप कोरेत हे आदिवासी नेतृत्व म्हणून समोर आले असुन या भागातील अनेक प्रश्नांना त्यांनी विवीध आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या संदीप कोरेत यांना युतीमुळे तिकीट मिळण्याची आशा धूसर झाल्याने त्यांनी मनसे कडून विधान सभेची निवडणुक लढविली होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अहेरी उपविभागात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यांच्या सोबत अहेरी, एटापल्ली, सिरोंचा , भामरागड व मुलचेरा तालुक्यामधुन अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून त्यामध्ये अरुण शेडमाके, मनोहर शेडे,वसंत डुरके,राकेश कोरेत, प्रशांत चमकरी, रमेश जवा, किरण जंगम, रवी आलाम, सुधाकर कोरेत, महेश झाडे, संदीप चंदावार, श्रीनिवास जवा, मिरवा मत्तामी सूरज शेनीगारपवार, मनिष बाचाड प्रणय टाकुर , लाचना चापिडी,श्रीनिवास जेवा राजकुमार कलेम,
,हरिष पिर्ल्ला ,मनोज जनगाम
संपत जगगम ,दामोदर चापिद्दी
मधुकर अत्राम ,रमेश सडमेक
संतोष चंदावर ,राकेश बिर्दू
राजकुमार मानेम ,दासरी जंपन्न
संतोष सिडम,राजू जानगम
रविकुमार डूरके ,
समस्या अत्राम,रमेश पागे
सडवली अत्राम ,संतोष अडेट्टी
प्रवीण भगत,सुनील भगत
रवी सोदरी ,विलास पिर्ला
मुलांना कुडमेते,नागेश कुमारी
मधुकर बुरम ,मल्लया कुमारी
महेश डूरके ,अशोक अत्राम
महेश कमला,राजकुमार चौव्दारी
रुपेश चेमकरी,शिवला रुपेश ,
संपत तंगुला व इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली चे पालकमंत्री असता पासुन जिल्हयातील शिवसेना वाढीकडे त्यांचे विशेष आहे. त्यांनी गडचिरोली जिल्हयातील संघटनेला अधीक मजबूत करण्यासाठी अत्यंत विश्वासू असलेले किरण पांडव यांच्यावर जबाबदारी टाकली. किरण पांडव यांनी जिल्हयातील तरुण तुर्क व संघटन कौशल्य असलेल्या पदाधीकारी व कार्यकर्त्यांना बळ देत ग्रामपंचायत नगर पंचायत व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामद्ये यश संपादन केले. उत्तर गडचिरोलीतील कुरखेडा व दक्षिण गडचिरोलीतील मुलचेरा नगर पंचायतीत भगवा फडकवला. तसेच चामोर्शी,गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत यश संपादन करत सहकार क्षेत्रात प्रवेश केला. तसेच अनेक ग्रामपंचायती काबीज केल्या.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली असुन पक्ष संघटनेला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी मोर्चे बांधणीला सूरवात केली आहे.
*संदीप कोरेत यांच्या प्रवेशामुळे अहेरी उपविभागात शिवसेनेची ताकद वाढणार* – *राकेश बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख*
संदीप कोरेत हे ऊर्जावान नेते असून ते उत्तम संघटक आहेत. त्यांनी या भागातील अनेक समस्यांना वाचा फोडली आहे व विविध विकासकामांचा पाठपुरावा केला असुन इथल्या सर्वसामान्य व तळागाळातील लोकांशी त्यांची नाळ घट्ट जोडली असुन त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढवण्यास मदत होणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला