शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख यांची एटापल्ली तालुक्यातील डुम्मे येथे पुंगाटी कुटुंबाला दिली सांत्वन भेट

137

एटापल्ली:-
गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक जिल्हाप्रमुख मा. श्री. वासुदेवजी शेडमाके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दि. २१/०२/२०२५ रोजी शुक्रवारला प्रथमच एटापल्ली तालुक्याचा दौरा केला. पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक आटपून डुम्मे येथील प्रतिष्ठित नागरिक स्व. लालुजी पुंगाटी यांचं दि. १०/०२/२०२५ रोजी दीर्घ आजाराने आकस्मिक निधन झालं त्यांना या संदर्भात माहिती मिळताच तात्काळ डुम्मे येथे जाऊन पुंगाटी परिवारास भेट दिली. डुम्मे गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व या जगाला सोडून गेल्याने तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात दुःख व्यक्त केलं जात आहे आणि तुमच्या दुःखात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सहभागी आहे.
यावेळी अहेरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम, अक्षय पुंगाटी शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली, पप्पू शेख शहर प्रमुख गडचिरोली, चेतन उरकुडे युवा तालुका प्रमुख गडचिरोली, रुपेश बंदेला उप तालुका प्रमुख अहेरी, तेजस गुज्जलवार शिवसेना सोशल मिडिया तालुका प्रमुख, विशाल मेश्राम तसेच शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.