एटापल्ली (दि.२१/०२/२०२५):-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब, विदर्भ संपर्क नेते तथा आमदार मा. श्री. भास्कर जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार, पूर्व विदर्भ समन्वयक मा. श्री. प्रकाशजी वाघ साहेब,गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. श्री. महेश जी केदारी साहेब यांच्या सहकार्याने, गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख मा. श्री. वासुदेवजी शेडमाके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच श्री. अक्षय भाऊ पुंगाटी तालुका प्रमुख एटापल्ली यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरवात श्री. अक्षय भाऊ पुंगाटी यांनी प्रास्ताविक भाषणाने केली. यावेळी बोलत असताना नवनियुक्त जिल्हा प्रमुख मा. श्री. वासुदेवजी शेडमाके यांचं कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घ्यावे आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मध्ये नक्कीच याचा फायदा पक्षाला होईल व येणाऱ्या काळात एटापल्ली तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार असा प्रतिपादन करण्यात आल. त्यानंतर सुरजगाड लोह प्रकल्पामध्ये स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणी व महिला यांना रोजगार मिळण्याकरीता कटीबद्ध राहू असे सूचक करण्यात आले.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख श्री. दिलीप सुरपाम यांनी एटापल्ली तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान राबवून जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडावे व पक्षाचा विस्तार करावा अस संदेश देण्यात आलं.
यानंतर मुख्य आकर्षक म्हणून लाभलेले गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख यांनी संबोधित करताना एटापल्ली तालुक्यातच काम अतिशय चांगल्या प्रकारे तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात चालु आहे आणि आणि असच चालु राहावं. जनते पर्यंत पोहचून जनतेची समस्या सोडवा तसेच या भागात सत्तेतील लोकप्रतिनिधी असून सुद्धा ज्या पद्धतीने दर्जेदार विकास कामे व्हायला पाहिजेत तशी विकास कामे होताना या ठिकाणी दिसत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे अस मत मांडण्यात आले. आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त उमदेवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या व कामाला लागा असा संदेश देण्यात आला. नगर पंचायत एटापल्ली येथे दुसऱ्यांदा पाणी पुरवठा सभापती पदी निवड झाल्याबद्दल श्री. नामदेव हिचामी यांचं अभिनंदन करण्यात आले. जिल्हाप्रमुख मा. वासुदेव जी शेडमाके साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून एटापल्ली तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाच सूत्रसंचालन रिषभ दुर्गे यांनी केले.
या कार्यक्रमाला पप्पू शेख शहर प्रमुख गडचिरोली, चेतनभाऊ उरकुडे युवा तालुका प्रमुख गडचिरोली, रुपेश बंदेला उप तालुका प्रमुख अहेरी, नामदेव हिचामी पाणी पुरवठा सभापती न. पं. एटापल्ली, अश्विनी ताई गुज्जलवार तालुका संघटिका एटापल्ली, राजश्री ताई जांभूळकर तालुका (ग्रामीण) संघटिका एटापल्ली, दानू आत्राम, विशाल मेश्राम, मंगेश दुर्वा, किशोर गावडे, प्रशांत तलांडे, तेजस गुज्जलवार, स्वानणंद मडावी, रोहित गोंगले, प्रज्वलीत दहागांवकर, सुकलू हिचामी, अनिष दुर्वा, नरेश दुर्वा, दिनेश मडावी, आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.