माजी प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रमुख उपस्थिती
▪️अहेरी तालुक्यातील राजाराम ग्राम पंचायत कार्यालयात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जवळ मोमबत्ती प्रज्वलित करून राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,अँड.एच.के.आकदर,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना मारकवार,पेसा अध्यक्ष श्री.दिपक अर्का,राकेश तलांडे,मौबिलयझर सौ.अनिता आलाम शिपाई श्री सदाशिव गोंगले,रोज़गार सेवक श्री.नितीन मोतकुरवार आदि उपस्थित होते.