सोमनपल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आक्षेपार्ह लिखाण प्रकरण – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र निषेध!

134

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बस स्थानकावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व जातीय तेढ निर्माण करणारे लिखाण आढळले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करतो आणि प्रशासनाकडे मागणी करतो की दोषींना तातडीने शोधून कठोर कारवाई करावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे नेते असून, त्यांच्या कार्याचा अपमान म्हणजे संविधानावर हल्ला आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सामाजिक समरसता धोक्यात येत आहे आणि समाजात जातीय विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रशासनाला स्पष्ट इशारा देतो की, जर त्वरित कारवाई करण्यात आली नाही, तर भाकपाच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. कॉ.सचिन मोतकुरवार,