एटापल्ली तालुक्यातील कसन्सूर येथे 33/11 के.व्ही. वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गडचिरोली विभागाने यासंबंधी अधिकृत पत्र कॉ सचिन मोतकुरवार याना पाठविले
ऑल इंडिया किसान सभेच्या मागणीला यश:
या वीज उपकेंद्राची मागणी ऑल इंडिया किसान सभा आणि स्थानिक ग्रामसभेनी व इतर नागरिकांनीही सातत्याने केली होती. अनेक आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर या मागणीस मान्यता मिळाली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाचा विशेष निर्देश:
गडचिरोलीतील मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी यांनी संबंधित विभागाला पत्र पाठवून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कसन्सूर येथे वीज उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे.
आरडीएसएस योजनेंतर्गत प्रकल्प:
या उपकेंद्राचा समावेश केंद्र सरकारच्या पुनरुत्थान वितरण क्षेत्र सुधारणा (RDSS) योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे वीज वितरण अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होणार असून, परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
अधिकाऱ्यांकडून पुष्टी:
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनीही ही माहिती देत लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.