सामाजिक कार्यकर्ते रवीजी नेलकृद्री यांचे वाढदिवसाच्या निमित्याने एकल अभियान अंचल अंतर्गत जिमलगट्टा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न.

110

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, दुर्गा जराते मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एकल अभियान अंचल आलापल्ली संच जिमलगट्टा येथे दिनांक. 16 फेब्रुवारी 2025 ला भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात डॉ,दुर्गा जराते मॅडम , स्नेहल चौधरी मॅडम , डॉ.सुहास मेश्राम सर, सुलोचना चिलनकर, वंजाक्षी नारनवरे . प्राथमिक आरोग्य सेविका व जिमलगट्टा केंद्रातील संपूर्ण स्टाप उपस्थित होते.उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथील रक्त पुरवठा टिम तसेच श्री. रवीजी नेलकुद्री अंचल समिती अध्यक्ष, यांचे वाढदिवसाच्या निमित्याने रक्तदान करून कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आले आहे. त्या वेळी उपस्थित श्री.प्रशांत जी नामनवार ग्राम संघटन प्र. रेणुकाताई कंचकटले संभाग आरोग्य योजना प्रमुख महेश बुरमवार अंचल अभियान प्रमुख, संजु चौधरी अंचल प्राथमिक शिक्षा प्रमुख दिलीप शेडमाके अंचल कार्यालय ,संच प्रमुख जिमलगटटा प्रभाकर वेलादी, संचाचे संच प्रमुख कोमरय्या तलांडी , 10 संचाचे संच प्रमुख तीन संच तीन आचार्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात अहेरी परिसरात रक्ताची तुडवटा लक्षात घेऊन एकल अभियान परिवारातील लोकांनी रक्तदान करण्याचे ठरवले. व एकूण 27 लोकांनी या शिबिरात रक्तदान केले.
तसेच 45 लोकांचे आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार करून आरोग्य बद्दल घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.