मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी*- तालुक्यातील उमानूर जवळील मोंडीगुठ्ठा येथे भुलक्ष्मी स्पोर्ट् मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले.
सदर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोमेश्वर गेडाम तर उदघाटक म्हणून संदीपभाऊ कोरेत, सह उदघाटक जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, प्रमुख पाहुणे म्हणून अमित बेझलवार,सुधाकर कोरेत,प्रसाद वेलादी,संदिप चंदावार, व्येंकटस्वामी गेडाम माणिकराव गेडाम, रमेश कोरेत आदी उपस्थित होते.
मोंडीगुठ्ठा येथे दरवर्षी अनेक खेळांचे स्पर्धे भरवले जाते त्याच प्रमाणे यंदा क्रिकेट स्पर्धा अयोजन करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत परिसरातील 30 संघांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन अविनाश गेडाम तर आभार प्रदर्शन हंसराज गेडाम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करिता मंडळाचे अध्यक्ष प्रवीण आलाम उमेश गेडाम,अक्षय गेडाम,रवी गेडाम, यशवंत गेडाम काशिनाथ गेडाम,राहुल गेडाम यांनी सहकार्य केले.