मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोली जिल्हा हा अती दुर्गम आदिवासी बहुल म्हनून ओडखला जात होता व या जिल्हयातील आदिवासी समाजासाठी सामाजिक शैक्षणिक, विकासात्मक ज्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे अश्या मान्यवरांना जिल्ह्यातील अलग अलग तालुक्यातील ओद्योगिक प्रक्षिषण संस्थांना (ITI) त्या मान्यवरांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पण आदिवासीं समाजाच्या विकासासाठी व आर्थिक उनत्ती साठी अंतिम श्वासापर्यंत लडणाऱ्या व जोपर्यंत आदिवासी समाजाचा विकास होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल जोडे लावणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा घेणाऱ्या भाजपचे नेते आदिवासी जननायक स्व जोगाजी मडावी यांचा सरकारला विसर पडणे हे पचवणे आदिवासी समाजासाठी अत्यंत त्रास दायक आहे तरी आदिवासी जननायक जोगाजी मडावी यांचा त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांचा योग्य सन्मान करावा अशी मागणी संदीप भाऊ कोरेत युवा नेता मनसे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व सह पालकमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे केली आहे
तेंदु संकलन जिल्ह्यातच सूरु करुण स्थानिकांना रोजगार मिळावा म्हनून आलापल्ली ते गुडेम (तेलंगणा) दिड हजार पेक्षा जास्त बैलबंडी मोर्चा (माजी पंतप्रधान) व्ही पी सिंग यांच्या नेतृत्त्वात काडणारे, तसेच तेंदूपत्त तोडणाऱ्याना बोनस. मिळावे या साठी हंसराज अहिर यांच्या नेतृतवाखालील नागपुर विभागीय कार्यालयावर मोठे जन आंदोलन करून दिला आदिवासींना जगण्याचा आर्थिक आधार देणाऱ्या तसेच आदिवासी समाजासाठी वनहक्क जमिनीसाठी पाहिले आंदोलन करणारे उमानुर, बेजुरपल्ली, रेगुलवाही, मुलेवाही, मरपल्ली, करंचा, दुब्बागुदेम या आदिवासी गावांना आंदोलनां तून विद्युत पुरवठा सूरु करुण देणारे तसेच पेपार मील साठी लागणाऱ्या बाबू कटाई साठी रेट वाडवण्यासाठी आंदोलन करणारे भारतीय जनता पक्षाचे वतीने आमदारकी लडवून 27000च्या वर मत घेणारे आणि जोपर्यंत आदिवासी समाजाचा सर्वपरी विकास होणार नाही तोपर्यंत पायात जुते चप्पल लावणार नाही अशी भीष्म प्रतिघ्या घेणारे व अंतिम श्वासापर्यंत समाजाच्या विकासासाठी शेकडो आंदोलन करीत सरकारचा लक्ष वेधनारे आदिवासी समाजासाठी लडणाऱ्या योद्धाचा सरकारला विसर पडणे आदिवासी समजासाठी मोठी शोकांतिका आहे तरी भाजपाचे भूतपूर्व स्वर्गीय नेते आदिवासी समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आदिवासी योधाचे केलेले कार्य स्मरण करून आदिवासी जननायक स्व जोगाजी मडावी त्यांचा योग्य सन्मान करा अशी मागणी वजा विणती संदीप कोरेत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या
मार्फत मुखमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सह पालकमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री यांच्या कडे केलेली आहे त्यावेळी उपस्थित सोनु वाकुडकर जिल्हा उपाध्यक्ष मनसे, संतोष मंचारला वार, रितेश मोहुरले,राजु मानेम, व ईतर







