मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी: स्थानिक:श्री शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयाची चमू दि.1/2/2025 रोजी गोंडवाना विद्यापीठ भरारी 2024-25 आंतर महाविद्यालयिन सांस्कृतिक महोत्सवात बतकम्मा लोकनृत्य मध्ये सहभागी झालेत. अहेरी तालुक्याच्या दक्षिणेस तेलंगणा राज्याची सीमा लागली असल्यामुळे येथील संस्कृती भाषा, लोकनृत्य तेलंगणा राज्याशी बऱ्याच प्रमाणात मिळती जुळती आहे. बतकम्मा हा तेलंगणा राज्यातील महत्त्वाचा सण नवरात्री उत्सवाच्या दरम्यान येतो विशेष करून यात देवीची आराधना केली जाते व स्त्रीशक्तीचा सन्मान, निसर्ग पूजा पर्यावरण संवर्धन यांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.बतकम्मा हे लोकनृत्य फक्त धार्मिक नसून सामाजिक ऐक्य आणि निसर्ग स्नेहाचा संदेश देणारा आहे या महोत्सवात श्री शंकरराव बेझलवार कला- वाणिज्य महाविद्यालयाची चम्मू तिरुपती कल्लेमवार, शुभदा मेकलवार, समीक्षा मडावी, विनोद तुंगाटी, कोमल पेंदोर,प्रीती वेलदा,निर्मला नरोटे, शेवंती पल्लो, डिंपल पुंगाटी, करुणा नरोटे,प्रीती वेलदा यांनी लोकनृत्य मध्ये सहभागी झालेत. या लोकरृत्याला उत्तम असा टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉ.विजय सोमकुवर सर व विद्यार्थी विकास प्रमुख प्रा. मंगला बनसोड, प्रा. सोनाली वाघ, प्रा. तन्वीर शेख प्रा.नामदेव पेंदाम,श्री. प्रतीक शिंपी यांनी या लोकनृत्याच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले पुढेही महाविद्यालयाचे नाव असेच मोठे करा म्हणत संस्थेचे सचिव सन्माननीय भरत भाऊ पोटदुखे, अध्यक्ष सन्माननीय अरविंद सावकार पोरेड्डीवार,कार्यकारी अध्यक्ष आमदार किशोर भाऊ जोरगिरवार यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.