संस्कार पब्लिक स्कूलचा देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत दिमाखदार विजय

81

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार*

एटापल्ली, 26 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर पंचायत एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्लीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने स्पर्धेत बाजी मारली.

उच्च प्राथमिक गटात विद्यार्थ्यांनी “भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” आणि “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला, तर प्राथमिक गटात “स्वच्छ भारत अभियान” या विषयावर सादर केलेल्या नृत्याने द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भरलेल्या नृत्य सादरीकरणाने प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकली.

संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते. या यशामुळे शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना उपविभागीय अधिकारी व नगर पंचायत सदस्यांनी संस्कार पब्लिक स्कूलला विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी शाळा म्हटले.