नवयुवक क्रीडा मंडळ,चापलवाडा येथे आयोजित भव्य खुले कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन मा. प्रणय खुणे यांचे हस्ते करण्यात आले.

105

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अनिल कांदो तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -०३/१३/२०२४

चामोर्शी – तालुक्यातील मौजा चापलवाडा येथे नवयुवक क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य प्रोढांचे खुले कबड्डी स्पर्धा आयोजित केले.सदर स्पर्धेचे उद्घाटन -मा.प्रणय खुणे प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार संघटना म. रा. अध्यक्ष -सौ.रेखाताई कोपरे सरपंच ग्रामपंचायत चापलवाडा प्रमुख पाहुणे- श्री नानुभाऊ उपाध्ये,श्री.कांबळे सर श्री चरणदास कांदो वनरक्षक श्री रमेश अधिकारी श्री माधव पोलीस पाटील चापलवाडा श्री बालाजी कुलेटी पोलिस पाटील कोरसेगट्टाश्री हितेश कोहपरे श्री सुरेश मेंडुरकर श्री .उपसरपंच चापलवाडा श्री रामटेके सदस्य यांचे उपस्थित उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

भव्य प्रोढांचे खुले कबड्डी स्पर्धांचे आयोजकांनी सहभागी कबड्डी विजेता संघास प्रथम क्रमांक पारितोषिक रु. ५००००/- द्वितीय क्रमांक पारितोषिक रू.३००००/- तृतीय क्रमांक पारितोषिक रु.२००००/रोख रक्कम अंतिम विजयी तिनं संघाना पारितोषिक देण्यास आयोजिले आहे. उद्घाटन प्रसंगी मा.प्रणय खुणे सर्व प्रथम सदर क्षेत्रातील विविध घडामोडींवर चर्चा केले व सहभागी सर्व संघांनी खेडाळुवृतीने आपल्याकडे असलेल्या कौशल्याचे मैदानावर दाखवून विरोधी संघांवर मात करावे असे सर्व संघातील खेळाडू यांना आवाहन केले.तर मा.खुने सर यांनी सहभागी संघातील खेळाडू कोणत्याही वादविवाद न करता आयोजकांनी निवड केलेल्या पंचांची निर्णय अंतिम राहील याची जाणीव ठेवावी आणि आपली खेळाडू वृत्तीने खेळ करावे असे सांगितले. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व संघातील खेळाडू यांना चांगले खेळ करण्याचा शुभेच्छा दिले.

कार्यक्रमा प्रसंगी नवयुवक क्रीडा मंडळ अध्यक्ष श्री गर्तुलवार , सत्यवान तंटकवार, ज्ञानेश्वर गर्तुलवार व मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावकरी यांनी सहभागी होऊन सहकार्य केले.