ट्रक अपघातात अजून किती बळी घेणार???* मृतक गणेश मडावी व रवि मडावी यांच्या कुटुंबियांना  योग्य न्याय द्या* *सूरजागड कंपनीची मनमानी आता खपवून घेतल्या जाणार नाही*

991

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*मुलचेरा*:- तालुक्यातील लगाम येथील रस्त्यावर  लगाम येथील गणेश मडावी व रवि मडावी नामक युवकांचा अपघाताने मृत्यू झाला. सूरजागड कंपनीचे ट्रकनी धडक दिल्याची चर्चा असून तात्काळ योग्य ती चौकशी व तपास करून लगाम येथील मृतक गणेश मडावी व रवि मडावी यांच्या कुटुंबीयांना  योग्य न्याय द्यावा,  या आधी सूरजागड कंपनीचे ट्रकनी असंख्याना चिरडले असून ट्रक अपघातात अजून किती जणांचे बळी घेणार?? सुरजागड लोहप्रकल्पाच्या असंवेदशीलतेमुळे परिसरात अपघातांचे सत्र संपता संपेना. या अपघतानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरजागड लोहप्रकल्प सुरू झल्यापासून या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे, मात्र प्रशासन, लोकप्रतीधींनी, आणि लोहप्रकल्पातील अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत रस्त्याची दूरवस्था आणि धुळीचा प्रकोप यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.रस्त्यावर पाणी टाकून धुळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी रस्ता चिखलमय झाल्याने दुचाकीस्वाराचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत.
प्रशासनावर कडक टीका:
सुरजागड प्रकल्पामुळे परिसराच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.स्थानिक लोप्रतिनिधीं आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या भागातील नागरिक हताश झाले आहेत. अपघातांमध्ये होणारी वाढ ही फक्त रस्त्याच्या खराब स्थितीचा परिणाम नाही,तर प्रशासनाची उदासीनता आणि त्याचे दुर्लक्ष देखील मुख्य कारण ठरले आहे.
आमचा जीवाची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे,पण त्यांच्याकडून कोणताही ठोस उपाय योजना होत नाही. आजवर अनेक लोक या अपघातांमध्ये जीव गमावले आहेत.पण प्रशासन अजूनही कोणतीही ठोस कारवाई करत नाही,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
सुरजागड लोहप्रकल्पामुळे धुळीचे प्रमाण,रस्त्याची दुरवस्था,आणि वाढती अपघातांची संख्या ही मोठी समस्या बनली आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.