मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली, २ डिसेंबर: संस्कार पब्लिक स्कूल येथे देवसंस्कृती विश्वविद्यालय शांतीकुंज, हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय योगासन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे विशेष नेतृत्व देवकन्या कु. साधना, कु. अदिती आणि कु. वंदना यांनी केले.
या कार्यक्रमात शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगासनांचे महत्त्व सांगण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना योगासनांचे तांत्रिक व वैज्ञानिक महत्त्व समजावून दिले गेले. योगासने केवळ शारीरिक व्यायाम नसून मन:शांती आणि जीवनशैली सुधारण्यासाठी एक प्रभावी साधन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबिराच्या शेवटी उपस्थितांनी योगा दिनचर्येत समाविष्ट करण्याचा निर्धार केला.
संस्कार पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन व उपस्थित नागरिकांनी या शिबिराचे कौतुक करत भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.