भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतले कार्यकर्त्यांची बैठक #jantechaawaaz#news#portal#

61
प्रतिनिधी//

अडपल्ली येथे केले मार्गदर्शन.

मुलचेरा: तालुक्यातील अडपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी नुकतेच बैठक घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलचेरा तालुका अध्यक्ष

 तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच ममता बिश्वास,अडपल्लीचे उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम,माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, विवेकानंदपूरचे सरपंच भावना मिस्त्री,सुंदरनगरचे सरपंच जया मंडल आदी मान्यवर उपस्थित होते.

अडपल्ली येथे आयोजित बैठकीत ताईंनी विकास कामाबाबत आढावा घेत,नागरिकांची समस्या जाणून घेतल्या तसेच गावात आवश्यक सोयीसुविधा तसेच आरोग्य,शिक्षण आदी मूलभूत सुविधांवर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले.पुढील काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून ग्रामपंचायत तर्फे आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावात स्वछता राखून पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा देण्याबाबत सुचविले. अडपल्ली येथील

 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती सत्ता असून नागरिकांनी पक्षावर विश्वास दाखविला आहे.त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी नागरिकांनी सुद्धा उर्वरित विकास कामांसाठी ताईंनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.यावेळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.