स्वराज्य फाऊंडेशन आलापल्ली कडून अपघातग्रस्ताला मिळाली तात्काळ मदत

425

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:-रुपेश उंदीरवाडे राहणार भेंडाळा तालुका चामोर्शी वय 40 रुपेश शिंदेवाडी ट्रान्सपोर्ट मध्ये काम करत होता नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, आलापल्ली, अहेरी या ठिकाणी नेहमी ट्रान्सपोर्ट च्या गाडीत हमाल म्हणून कामाला येत होता सर्व दुकानांमध्ये सामान उतरवून देत होता दुपारी तीन च्या सुमारास आलापल्ली वरून अहेरी कडे जायला निघाले तेव्हा सिरोंचा पूला जवळ महाकाली वेल्डिंग चे काही सामान उतरवायचे होते सामान उतरवत असताना अचानक त्यांच्या पायावर
टीनाचे पत्रे पडले व त्यात त्यांचे दोन्ही पाय मोडले तिथल्या लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिके करीता संपर्क केला परंतु एकही रुग्णवाहिका तालुक्यात उपलब्ध नव्हती मग तिथल्या काही लोकांनी स्वराज्य फाउंडेशन च्या रुग्णवाहिकेला संपर्क केला संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे नेण्यात आले तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवण्यात आले