मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
*एटापल्ली* :- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 9 ऑक्टोंबर 2024 रोजी वनस्पतीशास्त्र मंडळाची (BIOSPIRIT) स्थापना करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे होते, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. नीलिमा खोब्रागडे, वन परिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली, प्रा. सुनील झिलपे सर, श्री. बी. डी. नागोसे, वनपाल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाळकृष्णा कोंगरे, डॉ. विश्वनाथ दरेकर, प्रा. निलेश दुर्गे, डॉ. राजीव डांगे, प्रा. भारत सोनकांबळे, डॉ. श्रुती गुब्बावार, प्रा. चिन्ना पुंगाटी, प्रा. अतुल बारसागडे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता यांनी वनस्पतीशास्त्राचे महत्त्व आणि कार्य याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल ढबाले तर प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. शरदकुमार पाटील आणि आभार डॉ. साईनाथ वडस्कर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी तथा बहूसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.