प्रतिनीधी//
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोली व गावकऱ्यांची मागणी
:- जिल्हा परिषद अंतर्गत टिकेपल्ली गावातील डांबरीकरण अतिनिकृष्ट बांधकाम केल्याने त्या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,गडचिरोली व ग्रामस्थांनी केली आहे.
ता. अहेरी/मुलचेरा येथिल टिकेपल्ली गावातील पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण करण्यात आले परंतु ते काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे . तसेच आजच्या स्थितीत दुसऱ्या टप्प्याचे
काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत आहे. हे काम सुद्धा कंत्रादाराकडून अतीशय नीकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. या भोंगळ कारभारामुळे गावातील नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचण होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वी नाली बांधकाम करण्यात आली होती परंतु बांधकाम झाल्यानंतर नालीच्या दोन्ही बाजूस मुरूम भरण्यात आले नाही. डांबरीकरण करतांना संबंधित विभागाचे अभियंता व कर्मचारी यांच्या संगमताने शासनाच्या पैशाचे भ्रष्टचार करण्यात आले हे दिसुन येते.यामुळे सदर कामाची चौकशी करून काम करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य दंडात्मक कारवाई करण्यात यावी व त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे व सदर काम हे योग्य रीतीने करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली व टिकेपल्ली गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हि बाब लक्षात घेऊन सबंधित प्रकरनाची चौकशी करून लवकरच निराकरण होईल असे आश्वासन दिले. यावेळी आदिवासी विकास परिषद
गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट, संपर्कप्रमुख बादल मडावी, डेविड पेंद्राम, रुपेश सलामे, भिमराव टेकुलवार यांच्यासह गावकरी बांधव उपस्थित होते.