मेडपल्ली ग्राम पंचायतीचा पोट निवडणुकीत राकाँचा उमेदवार बिनविरोध निवड. #jantechaawaaz#news#portal#

42

प्रतिनिधी//
अहेरी तालुका मध्ये येणारे ग्रामपंचायत कार्यालय मेडपल्ली येथील प्रभाग क्रमांक ०२ मध्ये पोट निवडणुक जाहीर झालेला आहे. 
       सदर पोट निवडणुक हे आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी जि.प.अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर )  यांच्या नेतृत्वात पोट निवडणुक लढण्याचा निर्णय झालेला होता.
         परंतु ग्राम पंचायत मेडपल्ली मधील प्रभाग क्रमांक ०२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री यशवंत नामदेव कोडापे हे बिनविरोध  ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवड झालेला आहे.
        म्हणुन नव नियुक्त ग्राम पंचायत सदस्य श्री यशवंत कोडापे यांना माजी जि.प. अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर )  हे पुष्पा गुच्छ देऊन  शुभेच्छा दिलेला आहे.
      यावेळी येरमनार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, श्री बाबुराव तोरेम – सामाजिक कार्यकर्ता, अहेरी चे नगर सेवक अमोल मुक्कावार, व्येंकटरावपेठा  चे उपसरपंच किशोर करमे, मेडपल्ली ग्रा. पं. सदस्य विलास वेलादी, बिच्यु गावडे, जोगा मडावी, भगवान मडावी, अनिल दुर्गे, कटिय्या तलांडी, सन्ना गावडे, शानु गावडे, चैतू उसेंडी, मनोज मडावी, लालु तलांडी, चरणदास नैताम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.