शहरातील अपघाताची मालिका सुरूच
गडचिरोली:-शहरातील अपघाताची मालिका मागील काही दिवसापासून सुरूच आहे. आज दूपारी ३:३० वाजता स्थानिक इंदिरा चौकात ट्रक आणि स्कॉर्पिओ ची धडक झाली. यात मात्र जीवितहानी झाली नाही.
सदर ट्रक क्रमांक CG -08/9097 हा चामोर्शी मार्गाहून इंदिरा चौकात आला होता. विरुद्ध दिशेने स्कॉर्पिओ क्रमांक MH 04/9599 ट्रक समोरून उजव्या बाजूनं समोरून ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केली असता ट्रक ला समोरून धडक दिली. यात ट्रक चालकाची चूक नसल्याची सूत्रांनी सांगितले.
शहरातील चंद्रपूर मार्गावर काही दिवसापूर्वी युवकास चिरडल्याची घटना घडल्याने मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी सर्वच स्तरावरून केली जात होती. यामुळे नगरप्रशासनाने अतिक्रमणावर बुलडोजर चालवत इंदिरा गांधी चौकासह शहरातील प्रमुख रस्ते मोकळे केले. अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच असतांना इंदिरा गांधी चौकात पुन्हा अपघात घडला आहे.
या वेळी पोलीस हे अतिक्रमण काढण्याच्या बंदोबस्त मध्ये होती. या किरकोळ अपघात नंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.







