विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ, नवनिर्मित प्रशासकीय भवनाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहण्याचे राष्ट्रपतींना साकडे #jantechaawaaz#news#portal#

48
प्रतिनिधी//

खा. अशोक नेते, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी घेतली भेट

दि.१० मे २०२३

गडचिरोली : अतिमागास, नक्षल प्रभावित,अविकसित, आंकाक्षित, असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी तसेच नवनिर्मित प्रशासकीय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण यावे, असे साकडे खासदार अशोक नेते व विद्यापीठचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना घातले आहे.

नुकताच दिल्ली येथील राष्ट्रपती ‘भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची खा. अशोक नेते व कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी भेट घेतली. यावेळी खा. नेते यांनी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ व

 प्रशासकीय ‘भवनाच्या लोकार्पणासाठी येण्याची विनंती केली. गोंडवाना विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरू असून यात विद्यार्थी उत्कृष्ट ज्ञानार्जनाचे धडे घेत आहेत. आपल्या येण्याने विद्यार्थी, पालक व गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल व या जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळेल. 

त्यामुळे आपण या सोहळ्याला आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहण्याची विनंती याप्रसंगी खा. अशोक नेते व कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.