प्रतिनिधी//
एटापल्ली,
शासनाच्या मानव विकास मिशन व जि.प. शिक्षण विभाग (माध्यमिक) अंतर्गत 09 मे 2023 रोजी स्थानिक राजीव गांधी हायस्कुल, एटापल्ली येथे दुसऱ्या टप्यात सावित्रीबाई यांच्या 24 लेकींना (विद्यार्थिनिंना) सायकलीचे वाटप पालक वर्ग श्री मधूकर पुंगाटी, सुधाकर लेकामी, गौतम कुंभारे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्र.मुख्याध्यापक श्रीकांत कोकुलवार , शिक्षक वर्ग सर्वश्री राजेश बारई, मुदस्सर शेख, व्यंकटस्वामी गोपाला, वासुदेव चनकापूरे, रामकृष्ण गुंडावार, ग्यानकुमारी कौशी, गणेश बारई, सुलतान पठान उपस्थित होते.
बाहेर गावावरुन ये-जा करणाऱ्या गरजु मुलींना व जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मानव मिशन योजने अंतर्गत मुलींसाठी मोफत सायकलीचे वाटप करून मुली शिक्षण घेऊन शिक्षणाचा दर्जा
उंचावण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही परिस्थितीत मुली शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळेतुन मिळणाऱ्या सर्व योजनांचा फायदा विद्यार्थिनींनी घ्यावा असे आव्हान मान्यवरांनी केले. सायकल मिळाल्याने सर्व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते.