माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना समर्थन देत शेकडो कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश भामरागड तालुक्यातील विविध पक्षांना धक्का.

134

*भामरागड:-* तालुक्यातील हेमलकसा येथील विविध पक्षाला धक्का देत अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकित राजे साहेबांना समर्थन देत पक्ष प्रवेश केला.त्यावेळी राजे साहेबांनी त्यांचे स्वागत केले.
राजे अम्ब्रिशराव महाराज हे आदिवासी विकास व वन विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या दूर करत आणि अनेक विकास कामे करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.आज त्यांच्या कर्तृत्ववान शैलीवर विश्वास ठेवत विविध पक्षातील कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत.मोठ्या प्रमाणावर इंनकमिंग त्यांच्याकडे सुरू आहे.!

यावेळी सुरज सडमेक नगराध्यक्ष न प भामरागड,जोगी मडावी,राखी सडमेक,पद्मा सडमेक,फुलाबाई सडमेक,मीरा इष्टम,अनिता नैताम,निळाबाई सडमेक,तुळसी गावडे,गणेश गावडे,सोनू इष्टाम,मोतीराम मडावी, पेंटा सडमेक,गजू पोरटेंट,आनंदराव सडमेक,बाबुराव पोरटेंट,दिवाकर सडमेक,विजय सडमेक,दीपक,सडमेक,संजू सडमेक,संतू मटामी,सुंदरदास सडमेक,सरजू सडमेक अशा अनेकांनी पक्ष प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी श्रीनिवास नामनवार,सागर बिट्टीवार,सागर कोहळे,ईपोलो सर,शुभम शिवरकर,श्रीकांत तोटावार,मधुकर रापतीवार यांनी पुढाकार घेतला..!