गोमणी येथील प्रभाकर विरमुलवार कुटुंबियांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून सांत्वनपर भेट.

44

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा : तालुक्यातील गोमणी येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रभाकर सावकार विरमुलवार यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळाली असता आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी प्रभाकर विरमुलवार यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन केले व विरमुलवार परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शुभमभाऊ शेंडे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगाम,विनोद रामटेकेसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.