एटापल्लीत रक्तदान शिबिरात 31 जणांनी केले रक्तदान श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाचा मानवतावादी उपक्रम

46

एटापल्ली: दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी एटापल्ली येथील श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 31 दानशूर नागरिकांनी रक्तदान करून गरजूंना नवजीवन देण्याचे पुण्यकार्य केले. या मंडळाच्या या उल्लेखनीय पुढाकारामुळे एटापल्लीतील रक्त साठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
यापूर्वी मंडळाने चित्रकला स्पर्धा, जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना,वृक्षारोपण,श्लोक पठण स्पर्धा,आनंद मेळावा आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून एटापल्लीतील गणेशोत्सवात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राघव सुल्वावार,उपाध्यक्ष राहुल कुळमेथे,सचिव संपत पैडाकुलवार,कोषाध्यक्ष उमेश संगर्थी,स्पर्धा प्रमुख अमोल गजाडीवार व तसेच सदस्य सर्वश्री प्रणय कासवटे,सुरज मंडल,आतिष खापणे,महेंद्र सुल्वावार,अंकित दिकोंडावार,रोहित बोमकंटीवार, साहिल हमंद,अनिकेत मामीडवार,सुमित नाडमवार, ओमकार मोहूर्ले,अनुप गजाडीवार या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचा पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे.