मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
एटापल्ली: मागील पाच वर्ष व त्यापेक्षा अधिक काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहेरी विधानसभेमधील तालुक्यातील आरोग्य विषयक तसेच रस्ते संदर्भात समस्या सोडवण्यासाठी शासन व प्रशासनाला शेकडो निवेदन दिलेली आहेत. परंतु काही मौजक मागणी सोडली तर आमच्या आरोग्य विषयक व रस्ते संदर्भात दिलेल्या निवेदनांची दखल आजपावेतो घेतली गेलेली नाही. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल भागामध्ये आल्या दिवशी एक ना एक आरोग्य सेवेच्या बाबतीत नाही त्या घटना घडत आहेत. ज्यामध्ये माता मृत्यू व त्याचे प्रमाण वाढणे, सेवेअभावी बालमृत्यू होणे, रुग्णवाहिके अभावी ग्रामीण रुग्णालयापासून कित्येक दूर असणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. आणि ही सर्वात मोठी दुर्दैवी बाब आहे. प्रस्थापित सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी या गोष्टीकडे पाहिजे तेवढी दखल घेतली नाही आणि या विषयाचा गांभीर्य त्यांना माहीत असून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
अहेरी विधानसभेतील तालुक्यांमध्ये ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु अजूनही बऱ्याच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची उपलब्धता नसून उपचारासाठी रुग्णांना मोठ्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारचे अनेक आरोग्य विषयक समस्या आहेत खालील मुद्यांमधून सुचवलेले आहेत.
खालीलप्रमाणे:-
1. तालुक्याच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची उपलब्धता करून देणे.
2. तालुक्याच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी.
3. तालुक्याच्या ठिकाणी गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची प्रॉपर रिपोर्ट असलेली मशिनरीज उपलब्ध करून देणे.
4. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका (ANM , GNM) पदांची संख्या वाढवणे.
5. प्रत्येक तालुक्यामध्ये शववाहिकेची व्यवस्था करणे.
6. गर्भवती महिलांच्या प्रसुतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी सिजर ऑपरेशन ची व्यवस्था करणे व सर्जन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी.
आदिवासी बहुल भाग असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार मा. श्री. धर्मरावबाबा आत्राम सत्तेत असून आणि त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्र्याचं कॅबिनेट मंत्रीपद असताना या भागात माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण अधिक असणे हि सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे या अतिशय संकुचित व अतिआवश्यक आरोग्यविषयक समस्यांचा तोडगा काढण्यासाठी वरील समस्येवर भर देऊन खासदार साहेबांनी ही समस्या सोडवावी.
रस्ते संदर्भात बोलायचं म्हटलं तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न नेहमीच अहेरी विधानसभेतील जनतेला पडत असतो. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेली आहे आणि मोठ्या थाटात देशपातळीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केलं परंतु जेव्हा गाव खेड्यापाड्यात आणि तालुक्यामध्ये गेल्यानंतर कळतं की अजूनही रस्ते तालुक्यापासून गावांपर्यंत पोहोचलेले नाही. आणि ज्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तिथे त्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. शासनाने विकासाच्या नावावर निधी उपलब्ध करून द्यायचे आणि कंत्राटदार त्या निधीचा गैरवापर करून तात्पुरता काम करायचं आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं म्हणजेच निकृष्ट दर्जेचे काम ह्या कंत्राटदारानी करायचा अशी परिस्थिती या अहेरी विधानसभेमध्ये चालू आहे. मग भामरागड तालुका असो सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी तालुका असो. भामरागड येथे कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे गरोदर महिलेला पूल नसल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने नाला पार करावा लागला. असे जिवंत उदाहरण अहेरी विधानसभेमध्ये पाहायला मिळत आहे. प्रशासन-कंत्राटदार यांनी जाणीवपूर्वक केलेल्या ह्या चुका आहे. आष्टी-अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे तसेच एटापल्ली ते चोखेवाडा राज्य महामार्गचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामध्ये सुद्धा केंद्र-राज्य सरकार आणि कंत्राटदार दिरंगाई करत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून सिरोंचा रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली असून नागरिकांना ये-जा करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे अनेक प्रकार कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे होत असून राष्ट्रीय महामार्गाचा काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे व ज्या ठिकाणी रस्ते किंवा पूल वाहून गेले अशा ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावे. सिरोंचा येथील 353C महामार्ग आणि 63 महामार्ग जोड़ रस्ता नंदीगाव फाटा ते राजीव नगर येथे महामार्ग क्रमांक 63 ला जोडणारा बायपास रस्ता बांधकाम मंजूर करण्यात यावे.
सिरोंचा तालुका हा तेलंगाना व छत्तीसगढ़ राज्याच्या सीमे लगत चा महाराष्ट्र राज्यातील शेवट चा तालुका आहे. तेलंगाना व छत्तीसगढ़ राज्यांना जोडणाऱ्या तालुक्यात बस डेपो नसल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिरोंचा पासून 110 किलोमीटर दूर अंतरावर अहेरीत बस डेपो असून सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना बस सेवा मिळत नाही. सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक गावाला बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सिरोंचा येथे स्वतंत्र बस डेपो मंजूर करण्यात यावे.
जारावंडी हे गाव एटापल्ली मुख्यालयापासून ५३ कि.मी. अंतरावर आहे. तसेच जारावंडी हा क्षेत्र लोकसंख्येच्या दृष्टीने बघितले तर मोठा आहे. छत्तीसगड सीमा लागून असल्याने त्या क्षेत्रामध्ये व्यापार फार मोठ्या प्रमाणे वाढत आहे. तेथील नागरिकांना बँक कामासंदर्भात नेहमी एटापल्ली मुख्यालयी प्रवास करावा लागतो. परंतु त्यांना बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे बँकेचे काम पूर्ण होत नाही आणि त्याच कामासाठी परत त्यांना दूरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे जारावंडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाख उपलब्ध करण्यात यावे.
मा.श्री. महेश जी केदारी साहेब संपर्कप्रमुख गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एटापल्ली च्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विषयक तसेच रस्ते व पूल संर्भात समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत (आष्टी-अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गचे काम, एटापल्ली ते चोखेवाडा राज्य महामार्ग)
2)सिरोंचा येथे स्वतंत्र बस आगार मंजूर करण्याबाबत.
3) एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उपलब्ध करण्याबाबत चे निवेदन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेव किरसान साहेब यांना महाविकास आघाडी पदाधिकारी आढावा बैठकीत देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित युवासेना तालुका प्रमुख अक्षय भाऊ पुंगाटी, नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी, तालुका संघटिका शहर अरुणाताई निकोडे, उपतालुका संघटिका शालिनीताई नैताम, तालुका संघटिका ग्रामिण राजश्रीताई जांबुळकर, शाखा प्रमुख तोडसा ऋषभ दुर्गे, शाखा प्रमुख एटापल्ली तेजेश गुज्जलवार तसेच शिवसेना कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.