महामार्गावरील झाडे तोडण्याचे कामाला प्रारंभ #jantechaawaaz#news#portal#

61

प्रतिनिधी//
वनपरिक्षेत्र कार्यालय प्राणहिता(रेपणपली) च्या पुढाकाराने 
अहेरी :- आलापली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र-
३५३ मार्गावरील गुड्डीगुडम ते उमानूर पर्यन्त डांबरीकरण होणार असून आज दिनांक २५ मे रोजी वन विभाग सिरोंचा अंतर्गत येणाऱ्या प्राणहिता वन परिक्षेत्र कार्यालय हद्दीतील मार्गालगत असलेल्या झाडे तोडण्याच्या कामाला अखेर प्रारंभ केले आहेत.
यावेळी ग्राम पंचायत गुड्डीगुडम चे सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम, प्राणहिता वनपरिक्षेत्र अधिकारी संजोग खरतड,वनपाल एस. एल. इप्पाला, वनरक्षक जी. एम. अडगोपुलवार,बि. एम. मात्रे कंपनी पुणे चे मॅनेजर शैलेंद्र सिंग यादव,  राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता वि. सि. वैद्य,सुपरवाईजर कैलास साताळे,अथर्टी इंजि. एस.एन.मिश्रा, मटेरियल इंजि. अनुज द्विवेदी,वन कर्मचारी सुनील कप्पलवार, राजू कोतकोंडावार, गंगाराम गावतुरे, कंपनीचे शिपाई नागेश कोडापे, ग्रा.प.सदस्य जयश्री आत्राम, श्रीकांत पेंदाम, रुपेश आत्राम, गंगाराम आत्राम, नागेश शिरलावार,राकेश सोयाम आदींनी उपस्थित होते.
आलापली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे अवस्था दयनीय बिकट होऊन गेला असून ४ ते ५ वर्षापासून मार्गावर खड्याचे साम्राज्य आहे.
अखेर प्रशासनाने सदर महामार्ग रुंदीकरण ,डांबरीकरण मंजूर केले परंतु वन विभागाच्या जाचक अटीमुळे कामाला प्रतीक्षा करावी लागली परंतु वन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने वन विभागाने मार्ग रुंदीकरण करण्यास झाडे तोडण्याच्या कामाला प्रारंभ केले आहेत.संबंधित कंत्राटदाराने डांबर प्लांट टाकून दोन वर्ष लोटले आहेत तरी कंत्राटदारानी पावसाळ्यापूर्वी काम सुरू करतील अशी अपेक्षा आहे.
पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. सदर महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास तेलंगणा, छत्तीसगड,महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना खुप मोठा दिलासा मिळणार आहे.