*अहेरी:* *अहेरी तालुक्यातील बाळापूर येथील युवक दामोदर बाबुराव ठाकरे हे खाजगी कामानिमित्त आलापल्ली येऊन परत स्वगावी जात असतांना त्यांचा मोटर सायकल चा संतुलन बिघडून अपघात झाल्याने दामोदर बाबुराव ठाकरे यांना गंभीर दुखापत होऊन सद्या त्यांच्यावर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.*
*दामोदर बाबुराव ठाकरे हा घरचा कर्ता पुरुष असून घरची परिस्थिती खूप हलाकीची असल्याने पूढील उपचार घेण्यास आर्थिक अडचण निर्माण झाल्याने दामोदर ठाकरे यांचे वडील बाबुराव ठाकरे हे आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली अडचण सांगितल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी बाबुराव ठाकरे यांना त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिले.*
*आर्थिक मदत करते वेळी बाबुराव ठाकरे यांच्या सोबत राजशेखर कोलावार,आत्माराम ठाकरे,श्रीकृष्ण रेषे,तुकाराम रेषे,अक्षय गाऊत्रे,अनिताबाई ठाकरे,राधाबाई ठाकरे,मायाबाई लेनगुरे,रेखा गुरुनुले,सविता कावळे तसेच माजी सरपंच दिलीप गंजीवार,संदीप बडगे,अंकुश दुर्गे,जुलेख शेख,विनोद कावेरी,विस्वास कोसनवार,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.*