विधानसभा निवडणुक ५० हजारांचा मताधिक्याने जिंकण्यासाठी जोमाने तयारीला लागा.-राजे अम्ब्रीशराव आत्राम

166

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा येते पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न, तुडुंब गर्दीने केली जोरदार नारेबाजी

*मुलचेरा:-* येथून माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी काल आपल्या झंझावाती दौऱ्याची सुरुवात केली, स्थनिक सभागृहात भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग राजेंनी फुंकले, ह्यावेळी तालुक्यातील ४२ बूथ मधून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य यांची तुडुंब गर्दी झाल्याने प्रशस्त सभागृहात जागाही कमी पडली.

यावेळी राजेंनी तब्बल १ तास पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना अहेरी विधानसभा क्षेत्रातील गंबीर समस्यांना हात लावत विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली, गेल्या ५ वर्षात संपूर्ण विधानसभा क्षेत्रात विकासाचे एक मोठे काम झाले नाही, उलट संपूर्ण विधानसभा क्षेत्र सद्या खड्डयात गेला आहे, रस्ते,आरोग्य, वीज ह्या प्रत्येक क्षेत्रात जनता कमालीची हैराण झाली असतांना आपले मंत्री सद्या हेलिकॉप्टर दौरे करीत हवेत फिरत आहेत, जनतेच्या समस्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधीला त्यांची जागा आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवा, त्यासाठी आजपासूनच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागून ह्यावेळी ५० हजारांचा मताधिक्याने मला निवडुन येण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन ह्यावेळी राजेंनी केले ह्यावर *राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है* अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना दाद दिली.

अहेरी जिल्हा, चेन्ना प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करीत राजेंनी सुरजागड प्रकल्पात ओरिसा, बिहार, झारखंड, तेलंगणा, तमिळनाडू येतील लोकांना नौकरी देऊन स्थनिकांना चौकदार केले जात असल्यावर जोरदार टीका करीत आपण जिंकल्यावर हे सर्व चित्र बदलविणार असल्याचा शब्द ह्यावेळी दिला.

यावेळी मंचावर प्रशांत कुत्तरमारे माजी जि. प.अध्यक्ष. प्रकाश दत्ता भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, संजीव सरकार ग्रामीण अध्यक्ष, दिलीप आत्राम शहर अध्यक्ष,बासुजी मुजुमदार, मारोती पेंदाम,विधान वैद्य,संतोष उरेते,दिलीप आत्राम,निखिल हलदार,प्रफुल दुर्गे, परदेशी पाटील,धनंजय विश्वास, तापन मलिक,किशोर मलिक,प्रभाकर नेवारे आदि उपस्थित होते!