माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून मदतीचा हात पुसुकपल्ली येथील भोयर कुटुंबाला केली १०,००० (दहा हजार रु) आर्थिक मदत!

231

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी:-* तालुक्यातील पुसुकपल्ली येथील रहिवासी मोहनिश भोयर यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला.परिस्थिती हलाखीची असल्याने भोयर कुटुंबियांना मोठा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते.ही बाब माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच आपल्या कार्यकर्त्यां मार्फ़त तातडीने *१०,००० हजार रुपयांची* आर्थिक मदत पाठवली. आणि यापुढेही भोयर कुटुंबियांना मदत करणार अशी ग्वाही दिली.विशेष म्हणजे राजे साहेब हे अनेकदा आपल्या क्षेत्रातील लोकांना अडी-अडचणीत, रोगाने ग्रासलेले,तसेच संकटात सर्वोपरी मदत करीत असतात.

यावेळी प्रमोद भोयर,राकेश डोके, शामराव कुळमेथे,रमेश उडतावार,चंद्रय्या झनकापुरे,व्येंकटेश चौधरी,नागेश बोरकुटे उपस्थित होते!