विद्यार्थ्यांनी जाणल्या करिअर च्या संधी #jantechaawaaz#news#portal#

116

प्रतिनिधी//

शिवकल्याण संस्थेचा आणि संकल्प एज्युकेशन फाउंडेशन चा पुढाकार









चामोर्शी:: आत्ताच बारावी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. इयत्ता बारावी हा करिअर बनविण्याच्या माध्यमातून आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. मात्र  अनेक विद्यार्थ्यांना बारावी पुढे काय करायचं असा प्रश्न पडत असतो. 

 साधारणतः मेडिकल, इंजिनियर,स्पर्धा परीक्षा या पलीकडचे विद्यार्थ्यांना माहिती नसतात आणि विद्यार्थ्यांचा मोठा संभ्रम निर्माण होतो.  त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना बारावी नंतर पुढे काय? या विषयाला घेऊंन, शिवकल्याण युथ मल्टीपर्पज डेव्हलपमेंट असोसिएशन आणि संकल्प एज्युकेशन फाउंडेशन यांच्यावतीने चामोर्शी येथील शिवाजी कानिष्ठ महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 
कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल आक्केवार यांच्या हस्ते संपन्न झाले. मार्गदर्शक म्हणून आय.एस.डी. एम.नोएडा चे विद्यार्थी अभय पेंदाम, फर्गूसन कॉलेज चे विद्यार्थी विशाल मेश्राम मुख्य अतिथी म्हणुन संकल्प एज्युकेशन फाउंडेशन चे संस्थापक  डॉ. पंकज नरुले, शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे उपस्थित होते.

 
कार्यशाळेत 40 युवकांनी सहभाग नोंदविला. सहभागी युवकांना पारंपरिक शिक्षण पद्धती वगळता इतर शिक्षणाच्या संधी,  विविध कोर्स,  स्कॉलरशिप व  नामांकित महाविद्यालय, विद्यापीठ त्यामध्ये प्रवेशाकरिता देण्यात येणाऱ्या विविध

 परीक्षा आणि त्यानंतरही ऍडमिशन पर्यंत सहकार्य करण्याबाबत  माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवकल्याण संस्था आणि संकल्प एज्युकेशन फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते.