मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
मुलचेरा:- तालुक्यातील चुटुगुंट्टा,दामपूर या दोन्ही गावातील गावकऱ्यांना संयुक्त रित्या हनुमान मंदिरा समोर एक सुसज्ज असा सभा मंडप बांधकाम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आर्थिक अडचण आहे ही बाब स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या पर्यंत पाठवली त्यावेळी राजे साहेबानी 50000/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत केली होती.
आता काही दिवसांनी पुन्हा चुटुगुंट्टा,दामपूर या दोन्ही गावातील स्थानिक गावकऱ्यांना सभा मंडप बांधकाम प्रगती पथावर असून काही प्रमाणात आर्थिक अडचण उद्भवत आहे,पुन्हा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे,ही माहिती राजे साहेबांना कळताच त्यांनी आपले कार्यकर्ते पाठवून त्यांना पुन्हा 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.आपण सर्वोतोपरी पुन्हा सहकार्य करणार असे आश्वासन सुद्धा दिले.
त्यावेळी संपूर्ण चुटुगुंट्टा,दामपूर येथील गावकऱ्यांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले..!
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,गिरीश मद्देर्लावर सर,शंकर बुरामवार,सत्यनारायण आत्राम,सागर मडावी,संदीप बुरामवार,वैष्णव ठाकुर,राकेश गुंतावर,प्रमोद चंदावार,दानाव बाबू सुरेखा मडावी, रायसिंग दब्बा तसेच गावकरी उपस्थित होते.