मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी:- अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत तिमरम अंतर्गत येत असलेल्या तिमरम येथे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अहेरी च्या वतीने महास्वामित्व योजने अंतर्गत सनद (मालकी हक्क) पट्टे हर्षवर्धनराव आत्राम माजी पंचायत समिती सदस्य यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.
जमिन महसूलची व्यवस्था व्हावी आणि जमीन मालकी हक्क कायम राहण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात नोंदी करून सनद वितरण करण्यास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पाठपुरावा केला असून तिमरम गाव वासीयांना मालकी हक्क म्हणून भोगधिकार कायम करण्यात आले.
सनद पट्टे वितरण प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम, भूमी अभिलेख अधिकारी पंकज अनभोरे,गुड्डीगुडम चे सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम,मांतय्या आत्राम माजी पंचायत समिती सदस्य,सामाजिक कार्यकर्ते मखमुर शेख, संतोष गणपूरवार, समय्या मडावी,सचिन गणपूरवार,अविनाश पातावार, नरेंद्र सडमेक,योगेश कोतकोंडावार तसेच गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. तिमरम येथील गाव वासीयांना सनद मालकी हक्क मिळाल्याने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गाव वासीयांनी मनापासून आभार मानले.