रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शिवकल्याण संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा #jantechaawaaz#news#portal#

47
प्रतिनिधी//

20 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चामोर्शी:: शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन या सामाजिक  संस्थेची स्थापना 7 जून 2022 रोजी करण्यात आली होती. 07 जून 2023 रोजी संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले. संस्था स्थापन झाल्यापासून मागील एक वर्षात संस्थेच्या माध्यमातून युवक, महिला

 आणि समाजातील इतर घटकांच्या कल्याणाकरिता विविध विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा,  स्पर्धा,  स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती अभियान,मआरोग्य तपासणी शिबीर,  पूरग्रस्तांना मदत, संविधान जनजागृती अभियान यासारखे अनेक उपक्रम राबविले.

 
याचेच अवचित्य साधून सामाजिक कार्याची वर्षपूर्ती एका सामाजिक कार्यातूनच व्हावी असा उदात्त हेतू ठेवून चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथे संस्थेच्या वतीने  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या  शिबिरात 20 पेक्षा अधिक तरुणांनी सहभागी होत रक्तदान केले व सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले.

 
रक्ततदान शिबिराचे उद्घाटन  वालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरुण मडावी, संस्था अध्यक्ष अनुप कोहळे, आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
शिबिरात अनुप कोहळे, अतुल दुधबले, मुकेश कोहळे, प्रभाकर कोपूलवार, गजेंद्र भुरे, गजानन कुनगाडकर, रोशन कुनघाडकर, देवानंद कुकडकर, अजय गव्हारे, निलेश कुनघाडकर,  नितीन कोठारे,  संदीप कोपुलवार,  अक्षय सातपुते, सौरव मडावी, लीलाधर सोनुले, तुषार पिपरे, राज कोहळे, आशिष कारडे, नीरज कोहळे 

आदी युवकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय रक्त संकलन टीम,  शिवकल्यान संस्था सदस्य जितेश शेट्टीवार, संतोषी सुत्रपवार, प्रवीण चलाख, अविनाश आचला, प्रेरित कोठारे, निहाल शेळकी, सोशल मीडिया डिझायनर आशिष म्हशाखेत्री,  आदित्य सातपुते,  रोशन कोहळे, गौरव कोल्हटवार, यांनी सहकार्य केले.