प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
विध्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती कळावी, त्यांनी प्रक्रियेत स्वतः सहभागी होऊन लोकशाही पद्धतीतील निवडणुकीचे महत्व कळावे, यासाठी डिजिटल पोलिंग फर्मच्या माध्यमातून
एटापल्ली येथील संस्कार संस्था एटापल्ली व्दारा संचालित विजय संस्कार यांच्या संकल्पनेतील नामांकित संस्कार पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांची बालसंसद निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ घटित करण्यात आले. हा नाविन्यपूर्ण प्रयोग घेताना विध्यार्थ्यांना लोकशाही व निवडणुकीचे महत्व माहिती व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या दफ्तर मुक्त शनिवार या दिवशी ऑनलाइन डिजिटल पद्धतीने पोलिंग फार्म तयार करून निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपली पॅनल बनवली वेगवेगळ्या पदांसाठी आपले निवडणूक अर्ज करून रीतसर निवडणूक चिन्ह प्राप्त केले. पुढे नियमाप्रमाणे आपले प्रचार करून याचा अभ्यास केला. येणाऱ्या पदासोबतच जबाबदाऱ्या समजून घेतल्या. शाळेने मागील वर्षी बॅलेट पेपर चा वापर केलेला होता , यावर्षी ईव्हीएम चा अभ्यास म्हणून त्यात ईव्हीएम प्रमाणे ऑनलाइन मतपत्रिका तयार करण्यात आली. उमेदवाराच्या फोटोसह चिन्ह अपलोड करण्यात आले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शाळेतील उपलब्ध साहित्यातून राबवण्यात आली. यासाठी टॅब स्मार्टफोन यांचा उपयोग करण्यात आला. शासकीय निवडणूक प्रणालीवर आधारित स्मार्ट बोर्डवर मॉक पोल ईव्हीएम मतदान सराव घेण्यात आला. मतदान केंद्रप्रमाणे मतदान कक्ष व इतर अधिकारी वर्ग निवडणूक घेण्याकरिता विध्यार्थी संख्या विचारात घेऊन 8 बूथ सज्ज करण्यात आले व मतदान घेण्यात आले. मतदान संपल्यावर शालेय मंत्रीमंडळाच्या निकाल विद्यार्थ्यांसमोर घोषित करण्यात आला. ज्यात विध्यार्थी शाळा प्रमुख, उपप्रमुख, सांस्कृतिक प्रमुख, क्रीडा प्रमुख, विध्यार्थ्यीनी प्रमुख, पर्यावरण व आरोग्य प्रमुख आदींची निवड करण्यात आली. असे नावीन्य पूर्ण उपक्रम घेणारी शाळा म्हणून संस्कार पब्लिक स्कूल ही नामांकित आहे. यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यात प्रथम येण्याचा मान संस्कार पब्लिक स्कूल ला मिळाला आहे. याकरीता शाळेच्या सर्व शिक्षाकांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.