प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
महिला बचत गटच्या कर्ज मागणी अर्ज फाईली धूळ खात
एटापल्ली दिनांक २। ८। २४
बॅंकेचे व्यवस्थापक कर्तव्य तत्पर
एटापल्ली बॅंकेत कित्येक महिला बचत गट कर्ज मागणी व वाढीव मागणी करीता फाईल एक वर्षापासून बॅंकेला सादर केले परंतु बँकेने ह्या मागणी फाईल्स वाढीव मागणीचे कींवा नुतनीकरण करणारे फाईल्स आपल्याच कपाटात डांबुन ठेवले व पर्यायाने महीला बचतगट व्यवहार करण्यासाठी असमर्थ ठरले आहे. जेंव्हा आवश्यकतेनुसार कर्जाची मागणी करण्यासाठी बॅंकेत गेल्यात तेंव्हा बॅंकेत बॅंकेचे व्यवस्थापक हे आपल्या परीने नियम लावुन अडचणी निर्माण करीत आहेत.
आजच एका महीला बचत गटाने अशाच कर्ज मागणी संमंधी विचारणा केली असता त्यांना येरझारा मारायला लावले व कर्ज प्रकरण मंजूर करण्यास हरकती निर्माण केल्यात.
जर अशीच अवस्था राहीली तर बॅंकेचे उत्पन्नावर परिणाम होऊन बॅंकेचे उत्पन्न घटण्यास काहीच वेळ लागणार नाही तेंव्हा जिल्हा बॅंकेने वेळीच अशा व्यवस्थापकांना न आवरल्यास कर्ज घेणारे कर्ज घेणे बंद केल्यावाचून राहणार नाही. व आजपावेतो कीती कर्ज प्रकरणे सादर झाले व कीती प्रकरणे मंजुर झाले व कीती प्रकरणे प्रलंबित आहेत याचा आढावा घेतला तर वस्तुस्थिती लक्षात येते. शिवाय व्यवस्थापक ग्राहकांची समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्याशीच हुज्जतबाजी करीत असतात. व एवढे नियमाचे पाबंदे असतील तर जिल्हा बॅंकेने त्यांचा बायोमेट्रिक तपासणी करावा व रूजु झाल्यापासून कीती वेळा उशीरा हजेरी लावली हे दिसून येईल.