प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
पावसातही तुडूंब गर्दी
*एटापल्ली*:- गडचिरोली जिल्हा मागासला आहे हे पुसून काढण्यासाठी व राज्यात अव्वल अर्थात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शुक्रवार 19 जुलै रोजी एटापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
मेळाव्यात अध्यक्ष स्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडूके, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख,तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्षा तथा येमली ग्राम पंचायतीचे सरपंचा ललिता मडावी, सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरेत, माजी प्राचार्य रतन दुर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशिक, नागुलवाही ग्राम पंचायतीचे उपसरपंच देउ पुंगाटी, नागुलवाही उपसरपंच राजु तिम्मा, जारावंडी ग्राम पंचायतीचे सरपंच सपना कोडापे, जवेली ग्राम पंचायत पंचायतीचे सरपंच मुन्ना पुंगाटी, माजी सरपंच नामदेव लेकमी, उडेरा ग्रा. पं. उपसरपंच बापू गावडे, गुरुपल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच कैलास उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, जिल्हा उद्योग विरहित असून जिल्ह्याचा व प्रामुख्याने अहेरी उपविभागाचा सर्वांगीण विकास व्हावे यासाठी ओद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी व गडचिरोली जिल्ह्याला इंडस्ट्रीज हब बनविण्यासाठी राज्यातील महायुती सरकार अनुकूल असून मुख्यतः महिलांचे सक्षमीकरणासाठी व स्वावलंबन करण्यासाठी मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना कार्यान्वित करण्यात आले राज्यात महायुती सरकार अनेक क्रांतिकारक,ऐतिहासिक , लोकाभिमुख निर्णय घेत असून जनतेनी क्रांतिकारक निर्णय घेणारे महायुती सरकारच्या पर्यायाने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे म्हणत मंत्री ना. आत्राम यांनी गोंडी भाषेत यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी प्राचार्य रतन दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे व प्रामुख्याने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर प्रकाश टाकले.
उल्लेखनीय म्हणजे भर पावसात व रोवनीचे हंगाम सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुडूंब गर्दी होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक संजय चरडुके यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले, उपस्थितांचे आभार श्रीकांत कोकुलवार यांनी मानले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, महिला भगिनी व तालुक्यातील बहुसंख्येनी जनता उपस्थित होते.
*रा. काँ. पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन!*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते येथील मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे फित कापून उदघाटन करण्यात आले असून आता अजून पक्षाला नवी उभारी मिळणार आहे, यावेळी जनसंपर्क कर्यालयाचे कार्यालय प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.