प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा भाजपा नगरसेवकांचा इशारा.
जिल्हाधिकारी मा. संजय दैने यांना निवेदन देऊन भाजपा नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांनी केली मागणी.
नगरपंचायत अहेरी द्वारे मागील अडीच वर्षांपासुन बेकायदेशीर कारभार सुरु आहे.नियमबाह्य तथा अवैधरित्या झालेल्या कारभारांच्या वेळोवेळी तक्रारी नोंदविण्यात आल्या पैकी काही गंभिर विषयांवर अद्याप न्याय मिळाला नाही.नगर पंचायत अहेरीतील सत्ताधारी एकुण ९ नगरसेवकांनी एका अवैध अतिक्रमनाला संरक्षण देणारा ठराव बहुमताच्या आधारे पारीत करण्याचा गंभीर गुन्हा केलेला आहे.त्या विरोधात भाजप मार्फत तक्रार नोंदविण्यात आली होती त्या मामला क्र ८/२०२२ वर मागील दोन वर्षांपासुन सुनावणीच झाली नाही. बेकायदा व्यक्तींनी कारभार चालवणे हे समाजासाठी घातक ठरत आहे.
त्यानंतरही नगर पंचायत अहेरीत कित्येक प्रक्रीया अशीच बेकायदेशीरपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व प्रक्रीयांची चौकशी करणे अत्यावश्यक झाले आहे तसेच बेकायदा ठराव घेणार्या नगरसेवकांवर ताबडतोब कायदेशीर कारवाई आणि अपात्रतेचा निर्णय तातडीने घेण्यात यावा तसेच दि. २१ मार्च २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीची चौकशी व मामला क्र ८/२०२२ चा निवाडा तात्काळ करण्यात यावा यासाठी निवेदनवजा स्मरणपत्र मा. जिल्हाधिकारी संजय दैने यांना भाजपा पदाधिकारी तथा नगरसेवकांनी आज दिले.लवकर न्याय न मिळाल्यास दि ५/८/२०२४ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ऊपोषण करण्यात येईल असा इशारा ही ह्या निवेदनातून देण्यात आला आहे..!👇