आरोग्य सेवक पदभरतीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

210

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली,दि.15(जिमाका):जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षीका या पेसा संवर्गातील बिगरपेसा क्षेत्रात रिक्त असलेली पदे भरण्याकरीता आयबिपीएस कडून दिनांक 18 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 या कालावधीमध्ये परिक्षा घेण्यात येणार आहेत. सदर परिक्षेच्या प्रवेशपत्रकरीता डाऊनलोड लिंक व परिक्षेकरीता असणाऱ्या सुचनांची माहिती पुस्तिका जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे व त्यावरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन दिलेल्या परिक्षा केंद्रावर नियोजित वेळेवर उपस्थित रहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.
0000