पदश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते संगीता ठलाल यांचा सत्कार.

105

प्रतिनिधी//

इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क मुख्यसंपादक //सुरेश मोतकुरवार

कुरखेडा: मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी नाट्यश्री कलामंच जि. गडचिरोली येथे आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ह्या नवीन उपक्रमासाठी कविता पाठवली होती. तेविसाव्या सत्रात त्यांची उत्कृष्ट ठरलेली भृणहत्या ही कविता व उत्कृष्ट कवयित्री म्हणून संगीता ठलाल यांची निवड करण्यात आली होती. त्यांची निवड झाल्याबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी संगीता ठलाल यांच्या स्वगृही जाऊन त्यांचे अभिनंदन केले सोबतच पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, काही पुस्तके भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केले. व, ही दैनदिन नि:स्वार्थ साहित्य सेवा समाजापर्यंत पोहोचते पाहिजे तेवढे सोपे काम नाही ही साहित्य सेवा व समाजकार्य बघून अभिमान वाटतो म्हणून संगीता ठलाल यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यावेळी ठलाल कुटुंबाकडून सुद्धा पद्मश्री खुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. झालेला सत्कार बघून संगीता ठलाल गहिवरून गेल्या व पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे धन्यवाद मानले.